तंत्रज्ञान

WhatsApp Feature : व्हॉट्सॲपने लाँच केलं स्क्रिन शेअरिंग फीचर, कसं काम करतं ते जाणून घ्या...

व्हॉट्सॲपने लाँच स्क्रिन शेअरिंग फीचर केलं.

Published by : Team Lokshahi

व्हॉट्सॲप हे सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग ॲप आहे. स्मार्टफोन असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये हे ॲप पाहायला मिळतं. त्यामुळे युजर्संना आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवण्याचं काम व्हॉट्सॲपच्या माध्यमातून होत असतं. युजर्सच्या गरजा ओळखून त्यात नव्या फीचर्सची भर घातली जाते. असंच एका फीचर्सची भर व्हॉट्सॲपने युजर्ससाठी आणली आहे. या फीचरचं नाव स्क्रिन शेअरिंग असं आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या फीचर्सची माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरून सांगितलं की, “व्हॉट्सॲपच्या व्हिडीओ कॉलमध्ये स्क्रिन शेअरिंग फीचर जोडत आहोत.” या फीचर्सच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलिंग करताना मोबाईल स्क्रिन शेअर करता येणार आहे. या माध्यमातून एक युजर्स आपल्या मोबाईलमधील कंटेंट दुसऱ्या युजर्सला दाखवू शकतो. तसेच काही अडचण असेल तर त्या माध्यमातून सांगू शकतो.

व्हॉट्सॲपच्या स्क्रिन शेअरिंग फीचरमुळे दुसऱ्या मेसेजिंग ॲप्सच्या अडचणीत वाढ होणार आहे. शक्यतो मीटिंगसाठी लोकं गुगल मीट आणि झुम सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. या माध्यमातून स्क्रिन शेअरिंग करता येते. पण आता ही सुविधा व्हॉट्सॲपवर मिळणार आहे. त्यामुळे गुगल मीट आणि झुमच्या युजर्सवर परिणाम दिसू शकतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या