गणेशोत्सव 2024

मुंबईत गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर 'हे' मार्ग राहणार बंद

लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे. गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे.

चौपाट्यांवर पालिकेसह पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. मुंबईत गणपती विसर्जनाची धूम पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकी दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. यासोबतच गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत.

यामध्ये कुलाबा नाथालाल पारेख मार्ग, काळबादेवी जे. एस. एस. रोड, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, स्टर्न फ्री वे मार्ग, विठ्ठलभाई पटेल मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Niket Dalal Death: देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलालांचे निधन; हॉटेलमधील मुक्काम ठरला अखेरचा!

Latest Marathi News Update live : राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी

Ramayana Teaser : बहुचर्चित 'रामायण'चा टीजर प्रदर्शित, रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या लूकने वेधलं लक्ष

Laxman Hake : गिरगाव चौपाटीतील समुद्रात उतरून लक्ष्मण हाकेंचं आंदोलन; तर पोलिसांकडून धरपकड