पाच वर्षांपूर्वी 'मी पुन्हा येईन' असा दावा करणारे देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहे. महायुतीचं सरकार आज राज्यामध्ये स्थापन होत असून देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडतोय. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा आणि जे.पी.नड्डांसह केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योगपती, सेलिब्रिटीज उपस्थित आहेत. तसच देवेंद्र फडणवीस यांची पत्नी देखील उपस्थित आहेत यावेळी त्यांनी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार ही आनंदाची गोष्ट, फडणवीसांनी मोठा संघर्षाचा काळ पाहिला आहे.संयम, जिद्द, चिकाटीच्या जोरावर ते पुन्हा आले असल्याच ते म्हणाल्या.