महायुतीमध्ये सरकार स्थापनेवरून जोरदार हालचाली सुरू आहेत. ५ डिसेंबर रोजी शपथविधी होणार असल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने पराभवाबाबत चिंतन करताना ईव्हीएम मशीनवर खापर फोडलं आहे. पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक व लेखक बाबा आढाव यांनी ईव्हीएमविरोधात आत्मक्लेष आंदोलन सुरू केलं आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये घोटाळा झाल्याचा, ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा संशय आढाव यांनी उपस्थित केला आहे. आत्मक्लेष आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. आंदोलनकर्ते बाबा आढाव यांची शरद पवार यांनी भेट घेतली. त्यापाठोपाठ अजित पवार ही भेटीसाठी पोहचले आहेत. यानंतर त्यांच्या भेटीला मविआ आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यांनी भेट घेतल्यावर बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उपोषण सोडले आहे.
बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोडले उपोषण
बाबा आढाव उपोषण सोडण्याआधी बाबा आढाव यांच्या उपोषण सोडण्याच्या प्रक्रियेत मविआमधील जयंत पाटील म्हणाले की, सगळ्यांची अशी इच्छा आहे की आता तुम्ही उपोषण सोडाव... यानंतर बाबा आढाव हे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी प्यायले आहेत. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून आणि बाबा आढाव यांचे सहकारी जे त्यांच्यासोबत उपोषणाला बसले होते त्यांनी "भारत माता की जय" असा नारा सुरु केला आहे.
तसेच वंदे मातरम हा नारा देखील दिला आहे आणि ईव्हीएम हटावो देश बचाओ असा नारा देखील कार्यकर्त्यांकडून आणि बाबा आढाव यांचे सहकारी जे त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्या सहकाऱ्यांनी दिला आहे. असं सुरु असताना उद्धव ठाकरेंच्या हस्ते पाणी पित बाबा आढाव यांनी आपले उपोषण अखेर सोडले आहे.