व्हिडिओ

Mumbai : स्वातंत्र्यदिनी शिलाई मशीनचे वाटप

स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्तर भारतीय संघाकडून शिलाई मशीनचे वाटप गरजू महिलांना करण्यात आले.

Published by : Team Lokshahi

मुंबई: 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्तर भारतीय संघाकडून उत्तर भारतीयांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आर एन सिंग यांनी केले होते. कार्यक्रमामध्ये 76 शिलाई मशीनचे वाटप 76 गरजू महिलांना करण्यात आले.

समाजातील शेवटच्या बाकावर असलेल्या गरजू तसेच बेरोजगार महिलेला स्वतःचा रोजगार उपलब्ध करता यावा तसेच त्यांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. उत्तर भारतीय संघाकडून रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समाजातील सर्व घटक तसेच उत्तर भारतातील महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी संतोष आर्यन सिंग यांनी शिलाई मशीन वाटप करण्याचे निश्चित केले होते.

उत्तर भारतीय संघाने शिलाई मशीनचे वाटप केल्यामुळे त्यांचे आभार मानले आहेत. आता स्वतःचा व्यवसाय तसेच आपले स्वतःचे काही काम असेल तर ते इतर टेलरला देण्यापेक्षा स्वतःच घरी शिवून काढू, अशा प्रकारची भावना एकंदरीत महिलांनी व्यक्त केलेली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती