थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
(Mumbai Local) मुंबई लोकलमध्ये बसायला जागा मिळण्यासाठी शर्यत लागलेली पाहायला मिळते. पीक अवर्समध्ये तर पाय टाकायलाही जागा नसते. अशा वेळी सीट मिळणे आणि ते ही खिडकीजवळ ही प्रवाशांसाठी खूप मोठी गोष्ट असते. मात्र असे करताना अनेकदा भांडण, हाणामारी होताना पाहायला मिळते. अशीच एक घटना घडली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
उल्हासनगर स्थानकाजवळ घडलेली ही घटना. सुरुवातीला तुटपुंजी जागा मिळवण्यासाठी नेहमीसारखा वाद सुरू झाला. लोकलची सीट तीन जणींची असली तरी चौथ्या सीटवर जागा मिळवून प्रवासी बसतात.
मात्र एका तरुणीला जागा न दिल्यानं वातावरण चांगलंच तापलं. वाद वाढत गेला आणि अचानक संतापलेली तरुणी थेट समोरच्या महिलेच्या मांडीवर जाऊन बसली. हे पाहताच दोघींमध्ये ढकलाढकली सुरू झाली आणि प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचलं. अवाक झालेले प्रवासी हा सगळा प्रकार पाहत राहिले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा लोकलमधील गर्दी, सुरक्षितता आणि महिला डब्यातील वाढत्या वादांचा मुद्दा पुढे येत आहे.
Summery
मुंबई लोकलमध्ये दोन महिलांची हाणामारी
तरुणीला बसायला जागा न दिल्यानं वातावरण तापलं
हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल