वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. खंडणी आणि मकोका या दोन्ही गुन्ह्यांतर्गत कराडला न्यायालयालयीन कोठडी सुनावली आहे. व्हिडिओ कॉलद्वारे वाल्मिक कराडला ही सुनावणी देण्यात आली आहे. वाल्मिक कराडला कोठडीत सी पॅप मशीन वापरण्याची न्यायालयाने परवानगी दिली आहे.
याचपार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, हा तपास ज्या दिशेने चालला आहे. ती दिशा आता योग्य आहे असं मी समजतो... हे प्रकरण पुर्ण मुळासकट बाहेर काढण्याची गरज आहे, तरचं बीड स्वच्छ होईल... खरं तर आकाला पोलिसांनी नवीन पोलिस कोठडी द्यायला हवी होती म्हणजे तपासाद्वारे नव्या गोष्टी समोर आल्या असत्या, असं कॉंग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.