थोडक्यात
बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
अनेक गावांचा संपर्क तुटला
(Beed Heavy Rain) राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
यातच बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील पाटोदा आष्टी, शिरूर या भागामध्ये जोरदार पाऊस कोसळला. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरले असून त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या घरांमध्ये, जनावरांच्या गोठ्यामध्ये पाणी शिरले आहे.
आष्टी तालुक्यातील घाटा, पिंपरी, देवळाली, दादेगाव या गावांचा संपर्क तुटला असून सखल भागात पाणी साचलं आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी व शेतकऱ्यांची व्यथा सरकारने जाणून घ्यावी व तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.