थोडक्यात
राज्यात पावसाचा जोर कायम आहे
राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत वादळी पावसाचा इशारा
धाराशिव, लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात हाहा:कार
( Maharashtra Weather Update) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात ढगाळ वातावरण कायम असलेले पाहायला मिळत असून ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यात 28 सप्टेंबरपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धाराशिव, लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात पावासाचा हाहा:कार पाहायला मिळतो आहे. यातच बीड जिल्ह्यात शिरूर कासारला सिंदफणेने वेढा घातला. घराघरात पुराचे पाणी शिरले आहे. बीडमध्ये ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.