खराब कोलेस्ट्रॉल सकाळी टॉयलेटमध्ये काढून टाकेल 'हा' एक पदार्थ

Shweta Shigvan-Kavankar

कोलेस्ट्रॉलबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि आपल्या आहाराची आणि जीवनशैलीची काळजी घ्यावी लागेल.

खराब कोलेस्ट्रॉल

खराब कोलेस्टेरॉल तुमच्या नसांमध्ये जमा होते आणि रक्तप्रवाहात अडथळा आणते. यातून अनेक धोके आहेत.

तुमच्या कुटुंबातील कोणाला किंवा तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर ही रेसिपी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

इसबगोल

इसबगोल ही अशीच एक गोष्ट आहे, जी तुम्हाला खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात मदत करू शकते.

अभ्यासात दावा

काही अभ्यासकांनी असा दावा केला आहे की इसबगोल खराब कोलेस्ट्रॉल कमी करू शकते.

इसबगोल आतड्यात एक पातळ थर तयार करते. यामुळे कोलेस्टेरॉल शरीरात शोषले जाण्यापासून प्रतिबंधित होते आणि ते बाहेर जाते.

इसबगोल कसे घ्यावे?

एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा इसबगोल मिसळून प्यावे.

कधी प्यावे?

अभ्यासानुसार, कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी संध्याकाळी इसबगोलचे सेवन करावे.

किती वेळा प्यावे?

चांगल्या परिणामांसाठी, तुम्ही आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस इसबगोलचे सेवन केले पाहिजे.

हे करताना सोबत किमान एक ग्लास पाणी पिण्याचे लक्षात ठेवा.