Fashion : जर तुम्हाला स्टाईलिश दिसायच असेल तर वापरा हे टिप्स

shweta walge

प्लाझो पॅन्ट (Plazo pants)- हे आकर्षक असण्यासह आरामदायी देखील असतात. यासह आपण कॅज्युअल टॉप किंवा पारंपारिक कुर्तीही घालू शकता. हे तुम्ही प्रसंगानुसार परिधान करुन आणि आकर्षक दिसू शकता.

मॅक्सी ड्रेस (Maxi dress) - हे अतिशय आरामदायी असते, कोणत्याही हंगामात तुम्ही घालू शकता. हे सर्वांवर छान दिसतात. यांच्या सह फुटवेयर मध्ये हिल्स,फ्लॅट्स पासून व्हाईट स्नीकर्स देखील छान दिसतात.

शॉर्ट्स (Shorts) -आपण कधी शॉर्ट्स परिधान केले नसतील तर आपले फॅशन अपूर्ण आहे असे समजा. शॉर्ट्स क्रॉप टॉप,टॅंक टॉप शर्ट सह हे अतिशय स्टाईलिश लूक देतात.

जंपसूट (Jumpsuits) - जंपसूट खूप पसंत केले जातात. दिसण्यात देखील हे खूप स्टाईलिश लूक देतात.परिधान करायला देखील सहज आणि आरामदायी आहे.

भारतीय कुर्ती (Indian kurti) -आपण पारंपरिक ड्रेस परिधान करण्याची आवड ठेवता तर आपण भारतीय कुर्तीसह घट्ट फिटिंगची लेगिंग आणि जीन्स घालून बघू शकता. हे देखील खूप स्टायलिश लूक देते.

स्कर्ट (Skirt) -महिलांच्या कपाटात त्यांच्या शरीराच्या आकाराच्या मानाने स्कर्ट असावे. स्कर्ट ऑफिस, घरात, आउटिंगसाठी इत्यादी कोणत्याही प्रसंगासाठी परिधान केले जाऊ शकते आणि स्टाईलिश दिसू शकता.