नॅचरल ग्लोइंग स्कीनसाठी वापरा 'या' 6 गोष्टी

shamal ghanekar

एवोकॅडोमध्ये (Avocados)जीवनसत्त्वे ए, ई, सी, के, बी6, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम हे सर्व निरोगी घटक अढळतात. एवोकॅडोमुळे त्वचा निरोगी राहते. सूर्यप्रकाशामुळे होणारे नुकसान देखील कमी होऊन त्वचा मऊ राहते. तसेच त्वचेला निरोगी बनवण्यासाठी एवोकॅडोचा फेस मास्क लावा. यामुळे स्वच्छ, हायड्रेटेड आणि चमकदार त्वचा मिळेल.

Avocados

पपई केवळ पोटाचे आरोग्य राखत नाही तर त्वचेसाठीही खूप गुणकारी आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि सी, याशिवाय पॅपेन नावाचे एन्झाइम असते. पपई खाल्ल्याने आतड्याची हालचाल, पचन व्यवस्थित होण्यास मदत होते.

Papaya

टोमॅटोमध्ये सर्वात जास्त लाइकोपीन असते. हा एक प्रकारचा कॅरोटीनॉइड आहे, जो अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो. टोमॅटोला लाइकोपीनपासून लाल रंग मिळतो. त्यामुळे लाइकोपीन हानिकारक ऑक्सिजन रॅडिकल्स काढून ठाकण्यास मदत होते. टोमॅटोची पेस्ट त्वचेवर लावल्याने अतिनील किरणांच्या दुष्परिणामांपासून संरक्षण मिळू शकते.

Tomato

निरोगी त्वचेसाठी, तुम्ही स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, क्रॅनबेरी, गोजी बेरी, आवळा, रास्पबेरी इत्यादीचे सेवन केले पाहिजे. कारण या सर्व फळांमध्ये व्हिटॅमिन (vitamin) सी, टॅनिन, आहारातील फायबर, फिनोलिक ॲसिड आणि फ्लेव्होनॉइड्सचा समृद्ध स्रोत असतात. त्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यात मदत होते.

Berries

हळद (Turmeric) हा सर्वाधिक वापरली जाते. यामध्ये असलेल्या क्युरक्यूमिन या कंपाऊंडमध्ये प्रतिजैविक, अँटीऑक्सिडंट, दाहक-विरोधी आणि अँटीनोप्लास्टिक गुणधर्म असतात. सोरायसिस, त्वचेचा कर्करोग, हायपरपिग्मेंटेशन, त्वचा संक्रमण आणि वृद्धत्वाच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी वापर केला जातो. हळदीचा वापर फेस पॅक म्हणून केला जातो.

Turmeric

ब्रोकोली( Broccoli)त्वचा तरुण ठेवते - ही एक क्रूसीफेरस भाजी आहे. जीवनसत्त्वे सी, ई आणि के, सेलेनियम, जस्त, पॉलिफेनॉल, लोह इत्यादींनी समृद्ध आहे. ब्रोकोलीमधील अँटिऑक्सिडेंट, अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेच्या आरोग्यास फायदेशीर आहेत.

Broccoli