रवींद्र जडेजाच्या पत्नीचा निवडणुकीत जलवा! जाणून घ्या रिवाबा जडेजांचा आमदार होण्यापर्यंतचा प्रवास

shweta walge

भाजप उमेदवार रिवाबा जडेजा यांनी गुजरातमधील जामनगर उत्तर विधानसभेची जागा जिंकली आहे. त्यांच्या समोर काँग्रेसचे उमेदवार बिपेंद्रसिंह चतुरसिंह जडेजा यांचे आव्हान होते. या निवडणुकीत रिवाबा या ४०,९६३ मतांनी जिंकल्या आहेत.

जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपने रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना उमेदवारी दिली होती. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये त्या मागे पडल्या होत्या. परंतु, त्यांनी नंतरच्या फेरीमध्ये आघाडी घेतली.

रिवाबा यांनी तीन वर्षांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. याआधी त्या करणी सेनेशीही जोडल्या गेल्या आहेत. रवींद्र जडेजाही त्यांना नेहमीच सपोर्ट करताना दिसतो. निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी पत्नीला खूप साथ दिली.

उमेदवारी मिळताच रिवाबा दोन कारणांमुळे चर्चेत राहिली. पहिली- त्या क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी आहे. दुसरी- त्यांची वहिनी विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये आहे आणि त्यांनी त्यांच्या विरोधात प्रचार केला.

रिवाबा जडेजाचा जन्म 5 सप्टेंबर 1990 रोजी गुजरातमध्ये झाला. त्यांचे वडील हरदेवसिंग सोलंकी हे व्यापारी आहेत आणि आई प्रफुल्ल सोलंकी भारतीय रेल्वेत काम करत होत्या.

रिवाबा जडेजाला रिवा सोलंकी या नावानेही ओळखले जाते. त्यांनी राजकोटच्या आत्मिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.

रिवाबा जडेजाने 17 एप्रिल 2017 रोजी भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजासोबत लग्न केले. दोघेही एका पार्टीत भेटले होते. रवींद्र जडेजाला भेटण्यापूर्वी रिवाबा त्यांची बहीण नैना (रवींद्र जडेजा फॅमिली) हिची खूप चांगली मैत्रीण होती. रवींद्र जडेजा आणि रिवाबा जडेजा यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबियांमध्ये एका खाजगी समारंभात लग्न झाले.

Web

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीही रिवाबा जडेजा अगदी साध्या वेशामध्ये दिसली. रिवाबा पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.