पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साजरी केली सुरक्षा दलासह दिवाळी; पहा फोटो

shweta walge

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाही दिवाळी सैनिकांसोबत साजरी केली. पंतप्रधान मोदी यांनी हिमाचल प्रदेश येते जाऊन सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद घेतला.

मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते दरवर्षी दिवाळी सीमेवर किंवा नियंत्रण रेषेवर भारतीय लष्करासोबत साजरी करतात. यंदा पंतप्रधान मोदी सैन्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहोचले.

पंतप्रधानांनी सैनिकांशी संवाद साधतानाची छायाचित्रे शेअर केली आहे. सैनिकांना त्यांनी मिठाईही दिली. X वरील आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''आपल्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहोचलो.''

दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि अद्भुत आरोग्य घेऊन येवो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले

२०२२ मध्ये कारगिलमध्ये पंतप्रधानांनी सैनिकांसह दिवाळी साजरी केली होती. तेव्हा त्यांनी दिवाळी हा साहशतवादाला संपवणारा सण असे सांगितले होते.

लेप्चा येथे सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी .