Aarey Metro car shed : आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला सुरुवात; पाहा फोटो

Team Lokshahi

अशातच पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत हे काम थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. याच प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. मुंबईतील गोरेगाव येथे असलेल्या आरे सोमवारी 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन'कडून करण्यात आलेल्या वृक्ष छाटणीचे प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.

वृक्ष छाटणीच्या नावाखाली आरेमध्ये आणि आरे कारशेडमध्ये झाडे कापण्यात आल्याचा आरोप करत या कामाविरोधात दोन याचिका दाखल झाल्या आहेत. आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता आहे. आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडचे (Aarey Metro Carshed) काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच कारशेड परिसरातील झाडे तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्याविरोधात मुंबईकरांनी, पर्यावरणप्रेमींनी आरे कॉलनीत जोरदार निदर्शने केली होती.

आरेतील मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित ठिकाणावरील काही फोटो समोर आले आहेत. कामाला वेग आलेला पाहायला मिळाला आहे. मुंबई मेट्रोचे कारशेड हे आरेमध्ये न करता कांजूर अथवा इतर ठिकाणी करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

मेट्रो कारशेडच्या ठिकाणी बिबट्यांचा अधिवास असल्याचेही त्यांनी सांगितले.

आरेत कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीरपणे झाडे तोडण्यात आली नसल्याचा दावा मुंबई मेट्रोकडून करण्यात आला आहे. मागील आठवड्यात झाडांची छाटणी करण्यासाठी आरेतील मुख्य रस्ता बंद करण्यात आला होता. त्याच दरम्यान, आरेतील मेट्रो कारशेडच्या ठिकाणी असलेली झाडे तोडण्यात येत असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला होता.