Sindhudurg : 'माझा शिवबा रं...' राजकोट येथे महाराजांच्या भव्य पुतळ्याची उभारणी

Riddhi Vanne

सिंधुदुर्गांतील किल्ले राजकोट येथे पुन्हा एकदा नव्या उमेदीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यात आला आहे.

मागील वर्षी वादळात महाराजांचा पुतळा खंडीत झाला होता.

त्यानंतर आज म्हणजेच 11 मे रोजी पुन्हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.

महाराजांच्या पुतळ्याबद्दल सांगायचं झालं तर,

हा पुतळा राम क्रिएशन आर्टचे शिल्पकार राम सुतार यांनी तयार केला आहे.

या पुतळ्याची उंची 60 फूट इतकी आहे.

तसेच तलवारीसह उंची 83 फूट आणि जमिनीपासून संपूर्ण रचनेची उंची 93 फूट इतकी आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किमान 100 वर्षे कोणत्याही प्रकारच्या वातावरणात टिकेल.

या पुतळ्याला एकूण 31 कोटीहून अधिकचा निधी खर्च केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.