Riddhi Vanne
सध्या पावसाळा सुरु झाला आहे.
भिजून आल्यावर काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होते
मग वाट कसली पाहताय, आता बनवा चटकदार, गरमागरम स्टार्टर
चना कोळीवाडा Chana Koliwada
हा पदार्थ काबुली चण्याला बेसन, चटणी, हळद या मिश्रणामध्ये मिसळून तळलेला पदार्थ आहे.
पनीर पकोडा Paneer Pakoda
पनीर हे मसाला लावून बेसनच्या पीठामध्ये बूडवून तेलामध्ये तळले जातात.
मंचूरियन Manchurian
मंचूरियन हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे. कोबीपासून बनवलेले भजी शेजवान चटणीसोबत मस्त लागतात.
आलू टिक्की potato filled cutlet
आलू टिक्की ही उकडलेला बटाटा, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो बारीक चिरून त्यांची भाजी केली जाते. त्या मिश्रणाला गोल आकार देऊन तेलात तळले जातात.
ओनियन रिंग्स Onion ring
ओनियन रिंग्स कांदा गोल कापून त्याला बेसनचे मिश्रण लावून त्याला ब्रेडक्रम लावून तळावे.
फ्रेंच फ्राइज French Fries
फ्रेंच फ्राइज हा पदार्थ बटाट्यापासून तयार केला जातो. विशेष म्हणजे बचे कंपनीसाठी हा पदार्थ आवडीचा आहे.
कॉर्न भजी Cone Bhaji
मक्याचे दाणे काढून त्याच्यामध्ये चटणी, मीठ, हळद लावून त्याला तेलात तळून सॉससोबत खाऊ शकता