चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांचा आज लग्नाचा वाढदिवस साजरा होत आहे..या खास प्रसंगी दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांसाठी प्रेमळ मेसेज शेअर केले आहेत..जेनेलियाने लग्न, हळदी समारंभ आणि साखरपुड्याचे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत..या फोटोंवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे..रितेश देशमुखने जेनेलियासोबतचा एक मजेदार व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे..व्हिडिओमध्ये रितेश शाहरुख खानच्या ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील “चक धूम धूम चक धूम धूम”* हे गाणे गाताना दिसतो..३ फेब्रुवारी २०१२ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली.