पेट्रोल किंवा चार्जिंगचा त्रास संपणार, ही Electric car सौरऊर्जेवर धावणार

Siddhi Naringrekar

आता तुम्हाला कार प्रवास करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर अवलंबून राहावे लागणार नाही आणि चार्जिंग स्टेशनवर ईव्ही चार्ज करण्याचा त्रासही होणार नाही.

कारण आता अशी इलेक्ट्रिक कार (Electric car) बाजारात आली आहे, जिची बॅटरी सौरऊर्जेने चार्ज होईल. जर्मन ऑटोमेकर सोनो मोटर्सने नुकतेच या कारला लॉन्च केले आहे. जर्मन स्टार्टअप सोनो मोटर्सने इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये द सायन नावाची उत्पादन सादर केली आहे. या सौरऊर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कारचे उत्पादन 2023 मध्ये सुरू होण्याच्या तयारीत आहे.

ही कार बाजारात आल्यानंतर इलेक्ट्रिक कार (Electric car) चार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळणार आहे. सायनच्या उत्पादन आवृत्तीचे अनावरण करताना, सोनो मोटर्सने आगामी सात वर्षांसाठी कारचे उत्पादन लक्ष्य देखील उघड केले आहे. याअंतर्गत कंपनी या कालावधीत 2.5 लाख युनिट्स तयार करण्याची तयारी करत आहे.

या इलेक्ट्रिक कारचा लूक आणि डिझाईन तसेच आरामदायी प्रवासाची अनुभूती मिळेल.

या जर्मन कार उत्पादक सोनो मोटर्सचा दावा आहे की सायनमधील बॅटरी एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर सुमारे 300 किमीची रेंज देऊ शकते. ही पाच दरवाजांची इलेक्ट्रिक कार आहे, ज्यामध्ये 456 सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीने, वाहन एका आठवड्यात सुमारे 112 किमी अंतर कापू शकते.

द सायनबद्दल खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. याचा अंदाज यावरून लावता येतो की या कारसाठी आतापर्यंत 19,000 हून अधिक प्री-बुकिंग मिळाले आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार , कंपनी या कारच्या किंमतीबद्दल चर्चा करत आहे. त्याची किंमत $25,000 (रु. 19,94,563) असण्याची अपेक्षा आहे.