बॉलीवूडचे 'हे' सेलिब्रिटी साइड बिझनेसमधून कमावतात कोट्यावधी रुपये

Rajshree Shilare

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) आयपीएलची राजस्थान रॉयल्स ही टीम होती. पण नंतर तिने ती विकली. आता शिल्पाचे साइड बिझनेस म्हणून एक स्पा आणि सलून आहे.

Shilpa Shetty

अभिनेत्री दीपिका पदूकोणचा (Deepika Padukone) स्वत:चा कपड्यांचा ब्रँड आहे. ‘द लिव लव्ह लाफ फाऊंडेशन’ (The Live Love Laugh Foundation) हे देखील तिचे आहे.

Deepika Padukone

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे (Salman khan) सर्वच चित्रपट हिट ठरतात. त्याचा बिंग ह्यूमन हा ब्रँड खुप लोकप्रिय आहे. त्याचे एक प्रोडक्शन हाउस देखील आहे.

Salman khan

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान (Shah Rukh Khan). शाहरुखचे ‘रेड चिलीज’(Red Chillies) नावाचे एक प्रोडक्शन हाऊस आहे. तसेच कोलकाता नाइट रायडर (Kolkata Knight Rider)या आयपीएल टीमचा तो को-ओनर आहे.

Shah Rukh khan

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) बॉलिवूडसह हॉलिवूड चित्रपटामध्ये काम करताना दिसते. तिचे पर्पल पेबल्स पिक्चर्स नावाचे प्रोडक्शन हाउस आहे. तसेच न्यूयॉर्कमध्ये तिने सोना नावाचे एक रेस्टॉरंट सुरु केले आहे.

Priyanka Chopra

अभिनेता अजय देवगणचे (Ajay Devgan)अनेक साइड बिझनेस आहेत. त्याचे अजय देवगण फिल्म नावाचे एक प्रोडक्शन हाउस आहे. तसेच किडजानिया नावाच्या फॅमिली एंटरटेनमेंट इंटरनॅशनलमध्ये देखील अजय पार्टनर असल्याचे म्हटले जाते. तसेच गुजरातमध्ये त्याचे सोलार प्रोजक्ट असल्याचे म्हटले जात आहे.

Ajay devgan

अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan ) एक जीमचा मालक आहे. त्यासोबतच त्याचा कपड्यांचा एचआरएक्स ब्रँड देखील लोकप्रिय आहे.

Hrithik roshan

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे. तो हरिओम एंटरटेनमेंट प्रोडक्शन आणि ग्राजिंग गॉट पिक्चर्सचा मालक आहे. इतर काही ब्रँडसोबतही त्याचा टायअप आहे.

Akshay kumar

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) भावासोबत ‘क्लीन स्लेट’(Clean slate) नावाचे प्रोडक्शन हाऊस चालवते. त्यासोबतच तिचा एक कपड्यांचा ब्रँड देखील आहे.

Anushka sharma