गौहर खानच्या घरी हलला पाळणा; गोंडस मुलाला दिला जन्म

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री गौहर खानने आपल्या अभिनयाची छाप छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापवरही सोडले आहे.

तिच्या प्रेग्नेंसीबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय होता.

10 मे रोजी गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार यांच्या घरी एक छोटा पाहुणा आला आहे.

गौहरला पुत्ररत्न प्राप्त झाले असून याची घोषणा तिने सोशल मीडियावर केली आहे.

खऱ्या अर्थाने 10 मे रोजी आम्हाला खरा आनंद कळला आहे. आमचा मुलगा सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छाबद्दल सर्वांचे आभार मानतो, अशा भावना तिने कॅप्शनमध्ये मांडल्या आहेत.

गौहर खानवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.

गौहर खानने 2020 मध्ये जैद दरबार याच्याशी लग्न केले होते.

गौहर खान बिग बॉस 7 मध्ये दिसली होती.

तिने 2009 मध्ये रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर या चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर ती अनेक वेब सीरिजमध्ये दिसली.