ड्रामा क्वीन 'राखी सावंत' ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Team Lokshahi

'राखी सावंत ' एक नृत्यांगना, मॉडेल, अभिनेत्री आणि टेलिव्हिजन टॉक शो होस्ट आहे, त्याचबरोरब तिला ड्रामा क्वीन आणि कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणूनही ओळखले जाते.

तिने अनेक हिंदी, कन्नड, मराठी, ओडिया, तेलगू तसेच तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

तिचे सोशल मिडियावर लाखों चाहते आहेत, ती काही ना काही व्हिडिओ, फोटोज पोस्ट करून सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असते.

ती नेहमीच इतर सेलिब्रिटींबद्दल भाष्य करत असते, याचबरोरब तिच्या अनोख्या ड्रेसिंग सेन्स मुळे ती सगळ्याचेच लक्ष तिच्याकडे वेधून घेत असते.

तिने 1997 मध्ये 'अग्निचक्र' या चित्रपटातून रुही सावंत नावाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, सर्वत्र राखीचे दिवाने पसरलेले आहेत.

तिने बॉलीवूडमधील जोर का गुलाम, जिस देश में गंगा रहता है, आणि ये रास्ते हैं प्यार के अश्या अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका आणि नृत्यांकन देखील केले.

नुकत्याच बिगबॉस सीझन १४ च्या घरात ती प्रचंड फेमस झाली,आयटम सॉगं असो वा कॉमेडी भूमिका ती चर्चेत राहायला नेहमीच सज्ज असते.

राखी ने राजकारणात प्रवेश करून सुद्धा आया जादूने लोकांचे लक्ष वेधून घेतले.