लक्ष्य फेम अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र अडकला लग्नबंधनात; फोटो आले समोर

Shweta Shigvan-Kavankar

मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेत्री वनिता खरातनंतर आता छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्याने लग्नगाठ बांधली आहे.

अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र सेजल वर्देसह लग्नाच्या बेडीत अडकला आहे.

२४ फेब्रुवारी रोजी कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अभिजीत व सेजल यांचा विवाहसोहळा पार पडला.

त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नवदाम्पत्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पडाला आहे.

तर, अभिजीतने हळदीचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहे.

अभिजीतने जून महिन्यात सेजलसह गुपचूप साखरपुडा उरकला होता.

अभिजीत श्वेतचंद्र स्टार प्रवाहवरील लक्ष्य मालिकेतून तो घराघरात पोहोचला. त्याने ‘बाजी’, ‘साजणा’, ‘बापमाणूस’ या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सध्या तो ‘शुभविवाह’ या मालिकेतून भूमिका बजावत आहे.

सेजल वर्देही एक अभिनेत्री असून मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे.