सारा अली खानचा कान्सच्या रेड कार्पेटवर देसी लूक; यूजर्स म्हणाले, आम्हाला तुझा अभिमान

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री सारा अली खानने या वर्षी कान्समध्ये पदार्पण केले आहे.

यादरम्यानचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले असून सारा देसी अवतारात दिसत आहे.

कान्स पदार्पणासाठी तिने अबू जानी-संदीप खोसलाचा डिझायनर लेहेंगा घातला होता.

या हस्तिदंती लेहेंगामध्ये हाताने भरतकाम केले आहे.

साराने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी ड्रॉप इअरिंग्ज घातल्या आहेत

तर, तिने ग्लॉसी पिंक शेड, स्मोकी-गोल्ड आय शॅडोसह आपला मेकअप लूक केला होता.

यामध्ये सारा खूपच सुंदर दिसत असून युजर्सने तिच्यावर कमेंटसचा वर्षाव केला आहे.

एका युजरने लिहिले की, सारा आपला देश आणि आपली संस्कृती दर्शवते. तर, दुसऱ्याने म्हंटले, सारा तुझा अभिमान आहे.

यादरम्यान, एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. यामध्ये ती तिच्या 'भारतीयत्वाचा' असल्याचे सांगत आहे.

सारा अली खानचा विकी कौशलसोबत जरा हटके जरा बचके चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.