अभिनेत्री होण्यासाठी घरातून पळून गेली होती शहनाज

Shweta Shigvan-Kavankar

शहनाज गिलला आज सर्वच जण ओळखतात. आज तिचा 29 वा वाढदिवस आहे.

शहनाजला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं.

तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, अभिनेत्री होण्यासाठी ती घरातून पळून गेली होती. तिचे कुटुंबीय तिला चित्रपटसृष्टीत येण्यासाठी सपोर्ट करत नव्हते.

घरातून पळून गेल्यानंतर ती पीजीमध्ये राहत होती. त्यावेळी त्यांनी एक नोकरी सुरू केली ज्यामध्ये त्यांना 15 हजार रुपये मिळायचे.

घरचे फोन करायचे. पण, शहनाज उचलत नव्हती. मात्र, आज तिला या टप्प्यावर पाहून संपूर्ण कुटुंबाला शहनाजचा अभिमान वाटतो.

2015 मध्ये शहनाज गिल 'शिव दी किताब' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. 'माझे दी जट्टी'मधून तिला यश आणि ओळख मिळाली.

शहनाज गिलला पंजाबची कतरिना म्हंटले जाते. आणि जेव्हा ती बिग बॉसमध्ये होती. शोचा होस्ट सलमान खानही तिला 'पंजाबची कतरिना कैफ' म्हणून हाक मारायचा.

शहनाज गिलची बिग बॉस 13 मध्ये आणि सिद्धार्थ शुक्लाशी चांगली मैत्री झाली होती. चाहत्यांनाही ही जोडी खूपच आवडली होती. चाहते त्यांना सिडनाज म्हणून हाक मारायचे. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिल पूर्णपणे कोलमडून गेली होती.

शहनाज गिलच्या बॉलिवूड डेब्यूची जोरदार चर्चा सुरु आहे. शहनाज सलमान खान स्टारर फिल्म किसी का भाई किसी की जानद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला आहे.