सरसो के खेत, ट्रॅक्टरची सफर ते सुवर्णमंदिर; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवऱ्यासोबत पंजाब दौरा

Siddhi Naringrekar

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सोनाली सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते. ती तीचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

पंजाबशी तिचं खास नातं आहे. सोनालीच्या आईचा जन्म तेथे झाला आहे. त्या मूळच्या पंजाबी आहेत.

नुकतीच तिने अमृतसरमधील सुवर्णमंदिर या शीख धर्मीयांच्या पवित्र स्थानाला भेट दिली.

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने “आईचं माहेर, आमचं आजोळ, अमृतसर असल्यामुळे लहानपणापासून अगदी दरवर्षी सुवर्ण मंदिरमध्ये यायचो…”

“यंदा साधारण ६-७ वर्षांनी आलोय अमृतसरला … पण यंदाची सुवर्ण मंदिराची फेरी ही खास आहे”, असे लिहिले आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या पतीसह पंजाबला फिरायला गेली आहे. सोनाली, पती कुणाल आणि बेनोडेकर कुटुंबाचा सुवर्णमंदिराच्या भेटीदरम्यानचा फोटो.

काही दिवसांपूर्वी सोनाली तिच्या आजोळच्या गावी गेली होती. तीचे हे फोटो तीने शेअर केले आहेत. तीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.