कधी गजरा, कधी पाने! अदा शर्माची स्टाईल पाहून व्हाल थक्क

Shweta Shigvan-Kavankar

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा तिच्या आगामी 'द केरला स्टोरी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती फातिमा बाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अदा ही अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस आणि अनोख्या फोटोशूटसाठीही ओळखली जाते.

सूटमध्ये असो किंवा शॉर्ट ड्रेसमध्ये अदाची स्टाईल सर्वांनाच आवडते.

पारंपारिक पोशाखात गजरा परिधान करून अभिनेत्रीने आपली शैली दाखवली होती.

तिने एकदा झाडाच्या पानांमध्ये गुंडाळलेले फोटोशूट केले. तिची ग्लॅमरस स्टाइल पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले.

अभिनेत्रीच्या मिशा असलेल्या छायाचित्रानेही लोकांचे लक्ष वेधून घेतले.

अदाने न्यूजपेपरचा गाऊन घालून फोटोशूटही केले आहे.

अभिनेत्रीचे फोटोशूट नेहमीच वेगळ्या स्टाईलमध्ये असते. यामुळे अदाला अनेकवेळा ट्रोल देखील केले जाते.

अदा शर्माने 2008 मध्ये 1920 या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.