नवरी नटली! हिरवा चुडा, मेहंदी अन् नाकात नथ घालत सजल्या पाठकबाई

Shweta Shigvan-Kavankar

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम राणादा आणि पाठकबाई लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

हार्दीक जोशी व अक्षय्या देवधर यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता अक्षया देवधरचा नववधूच्या वेशातील लूक समोर आला आहे.

अक्षया ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.

तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

तुम्ही मला नववधूच्या वेशात पाहण्यासाठी उत्सुक आहात का? असा प्रश्न तिने कॅप्शनद्वारे चाहत्यांना विचारला आहे.

अक्षयाने शेअर केलेल्या या व्हिडीओत ती निळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे.

यासोबत मोत्यांचे दागिने, हातात हिरवा चुडा व नथही घातलेली दिसत आहे. तिच्या हातावर छान मेहंदीही रंगल्याचे दिसत आहे.

अक्षया व हार्दीनेक अक्षय्य तृतीयेदिवशी साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मागील काही दिवसांपासून त्यांच्या पत्रिकेचे व केळवणाचे फोटो समोर येत होते. मात्र, त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आली नाही.