घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएबच्या सानियाला वाढदिवसाच्या 'खास' शुभेच्छा

Shweta Shigvan-Kavankar

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा पाकिस्तानी क्रिकेटर पती शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत.

अशातच शोएबने सोशल मीडिया पोस्टद्वारे सानियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्त शोएबने सानियासोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.

फोटोसोबत शोएबने लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा सानिया, मी तुला निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तुझा दिवस आनंदात जावो.

परंतु, मध्यतंरी सानिया आणि शोएब मलिक यांनी अधिकृत घटस्फोट घेतल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

शोएब मलिकचे नाव मॉडेल आयशा उमरसोबत जोडले जात आहे. तर, एका शोदरम्यान शोएबने सानियाची फसवणूक केल्याचाही दावा करण्यात आला होता.

मात्र, याप्रकरणी सानिया आणि शोएबकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

पण, यादरम्यान सानिया मिर्झा आणि शोएब मलिक लवकरच एकत्र दिसणार आहेत. दोघेही एक टॉक शोमध्ये दिसणार आहेत.

सानिया आणि तिचा पती शोएब यांनीही त्यांच्या शोचे नाव उघड केले आहे. या नवीन कार्यक्रमाचे नाव 'मिर्झा मलिक शो' असे ठेवण्यात आले आहे. त्याचे पोस्टरही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. घटस्फोटाच्या प्रश्नांची उत्तरे कदाचित टॉक शो आल्यावर मिळतील.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी 12 एप्रिल 2010 रोजी हैदराबादमध्ये लग्न केले. 2018 मध्ये सानिया आणि शोएब आई-वडील झाले.