अमिताभ बच्चनच्या नातीचं बॅकलेस सूटमध्ये फोटोशूट; स्माईलवर चाहते फिदा

Shweta Shigvan-Kavankar

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा जरी ग्लॅमरच्या जगापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे.

'नव्या नवेली नंदा ही बी-टाऊनमधील सर्वात चर्चेत असलेल्या स्टार किड्सपैकी एक आहे. जी लाइमलाइटपासून दूर असूनही नेहमीच चर्चेत असते.

नव्या नवेली नंदाचे पॉडकास्ट असो किंवा तिची ग्लॅमरस फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.

सोशल मीडियावरही तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

नुकतेच नव्या नवेली नंदाने तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत आणि तिच्या बॅकलेस सूटला फ्लॉंट केले आहे.

या फोटोंमध्ये नव्याने पिवळ्या, केशरी, गुलाबी आणि पांढर्‍या रंगांच्या बॅकलेस सूटमध्ये दिसत आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

नव्याने कमीत कमी मेकअप केला असून मोकळ्या केसांनी तिचा लूक पूर्ण केला. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि कपाळावरची बिंदी तिच्या सौंदर्यात भर घालत होती.

नव्या नवेलीची हे फोटो पाहून तिचे चाहते भारावून गेले आहेत.

काही जण तिच्या स्माईलचे कौतुक करत आहेत तर काही तिला सुंदर सांगत आहेत.