महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्राचा अस्सल मराठमोळा लूक; चाहते फिदा

Shweta Shigvan-Kavankar

मराठीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकरने हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप सोडली आहे.

'चंद्रमुखी' चित्रपटामुळे तिची 'चंद्रा' अशी नवी ओळख निर्माण झाली आहे.

अमृता सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

तिने नुकतंच नवं फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त अमृताने मराठमोळा श्रृंगार केला आहे.

लाल साडीत अमृता खुपच सुंदर दिसत आहे.

यासोबतच तिने मी मराठी, जय जय महाराष्ट्र माझा हे हॅशटॅगही दिले आहेत.

तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडत असून त्यांनी कमेंटचा वर्षाव पाडला आहे.

अमृता खानविलकर मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही झळकली आहे.

अमृता लवकरच 'कलावती' या चित्रपटात झळकणार आहे.