बहिणीच्या मेहंदी सोहळ्यात स्मोकिंग करताना दिसली अनन्या पांडे; चाहते संतापले

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेता चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे सध्या चर्चेत आहे. चिक्की पांडे आणि डीन पांडे यांची मुलगी अलाना पांडे लवकरच लग्न करणार आहे.

अनन्या पांडेही तिच्या बहिणीच्या मेहंदी फंक्शनला पोहोचली होती.

या सोहळ्याचे फोटो आता समोर आले आहे.

यात अनन्या पांडेने तिच्या बहिणीच्या मेहंदी समारंभासाठी बेबी पिंक स्कर्ट आणि एक स्ट्रॅप क्रॉप टॉप घातला होता.

यासोबतच तिने मिडल पार्टेड हेअरस्टाइल आणि न्यूड मेकअपसह तिच्या लुकला पूर्ण केले.

या लूकमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे खूपच सुंदर दिसत होती.

अशातच, अनन्याचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती स्मोकिंग करताना दिसत आहे.

अनन्याचा हा फोटो पाहून चाहते संतापले आणि सोशल मीडियावर तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

या फोटोवर एका यूजरने लिहिले आहे की, माझी अनन्या हे करू शकत नाही. तर दुसर्‍याने लिहिले आहे, दिमाग तो होता नहीं इन लोगो को पास बस कूल देखना है. आणखी एकाने लिहिले की, मला धक्का बसला आहे.