Shweta Shigvan-Kavankar
अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते
कधी व्हिडिओ तर कधी रिल्स तर कधी फोटो ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच अंकिताने नवऱ्यासोबत नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यामध्ये तिने निळी साडी घातली आहे. सोबतच मोत्यांचे दागिने कॅरी केले आहेत.
केस मोकळे सोडत तिने न्यूड मेकअपसह आपला लूक पूर्ण केला आहे.
तर, विकी जैनने पांढरा सलवार-कुर्ता घातला आहे.
हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.
अंकिता २०२१ मध्ये विकी जैनशी लग्नबंधनात अडकली.
पवित्र रिश्ता मालिकेतून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेतून अल्पावधीतच अंकिता प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचली आहे.
अंकिता लोखंडे कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटात झळकली होती.