अर्जुन कपूरची बहीण कोणाला करतीयं डेट? रोमँटिक फोटो शेअर

Shweta Shigvan-Kavankar

अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर ही प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे.

अंशुला अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

परंतु, सध्या अभिनेत्री तिच्या लव्ह लाईफमुळे लाइमलाइट आली आहे.

नुकतेच अंशुलाने बॉयफ्रेंड रोहन ठक्करसोबत तिचे नाते अधिकृत केले आहे.

तिने रोहनसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

या फोटोमध्ये अंशुला समुद्राच्या मध्यभागी रोहनसोबत रोमँटिक पोज देत आहे.

या फोटोमध्ये दोघेही एकमेकांकडे मोठ्या प्रेमाने पाहताना दिसत आहेत. त्याचबरोबर अंशुलाही खूप आनंदी दिसत आहे.

हा फोटो शेअर करत अंशुलाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 366 म्हणजे एक वर्ष. यासोबतच अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये व्हाइट हार्ट इमोजीही तयार केला आहे.

अंशुलाच्या या फोटोवर केवळ तिचे चाहतेच नाही तर बॉलिवूड सेलेब्सही खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

अंशुला ही बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी शौरी कपूर यांची मुलगी आहे.