मालिका संपताच समृद्धी केळकरच्या घरी लगीनघाई?

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री समृद्धी केळकर ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतून किर्ती या नावाने प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली.

नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

पण, मालिका संपताच समृद्धीच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे.

समृद्धीने सोशल मीडियावर मेहंदी फंक्शनचे फोटो शेअर केले आहेत.

यामुळे तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

परंतु, मेहंदी फंक्शन समृध्दीचे नसून तिच्या मोठ्या बहिणीच्या लग्नाची मेहंदी आहे.

समृद्धीने हे फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये ‘ताईचं लग्न’असं कॅप्शन दिलं आहे.

या फोटोमध्ये समृध्दी आणि तिच्या ताईच्या हातावर मेहंदी असून त्या पोझ देताना दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

नक्की, ताईचं लग्न आहे की तुझं…? असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे.