नाकात नथ, कोल्हापूरी साज! अश्विनीचा पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट

Shweta Shigvan-Kavankar

आई कुठं काय करते मालिकेतील अनघा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात लोकप्रिय झाली आहे

अश्विनी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असून चाहत्यांसाठी नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

नुकतंच तिने नवीन फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

यावेळी अश्विनीनं अस्सल पेशवाई लूकमध्ये खास फोटोशूट केलं आहे.

नऊवारी साडी, नाकात नथ अशी पारंपारिक आभूषणे घालत तिने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

अश्विनीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले असून नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.

अश्विनी याआधी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत राणू अक्काच्या भूमिकेत झळकली होती.

तर, अश्विनी केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात झळकणार आहे.

येत्या 28 एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.