क्रिकेटर अक्षर पटेलने मेहाशी बांधली लगीनगाठ

Shweta Shigvan-Kavankar

सध्या लग्नांचा हंगाम सुरू झाला असून भारतीय क्रिकेटपटूही लग्नगाठ बांधत आहेत.

केएल राहुलपाठोपाठ आता टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर अक्षर पटेलने 26 जानेवारी रोजी मेहा पटेलशी लग्नगाठ बांधली आहे.

त्याचा सहकारी क्रिकेटर जयदेव उनाडकटही अक्षरच्या लग्नात पोहोचला होता.

जयदेव उनाडकटने हा फोटो त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवर शेअर केला आहे. त्याने "वेलकम टू द क्लब" असे लिहिले आहे.

अक्षर पटेल आणि मेहा पटेल यांनी गेल्या वर्षी 20 जानेवारी रोजी एंगेजमेंट केले होते आणि आता दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.

अक्षर पटेल आणि मेहा पटेल यांनी देखील संगीत समारंभात जोरदार ठुमकेही लगावले.

अक्षर पटेलच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही धुमाकूळ घालत आहे.

अक्षर पटेलची पत्नी मेहा पटेल एक प्रसिद्ध आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ आहे. ती फिटनेससाठी देखील खूप प्रसिद्ध आहे.