नवरी नटली...! पारंपरिक पद्धतीने पार पडणार राज-कावेरी यांचा लग्नसोहळा

Shweta Shigvan-Kavankar

भाग्य दिले तू मला या मालिकेची सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे. त्यातही राजवर्धन आणि कावेरी यांची जोडीही प्रेक्षकांची अत्यंत आवडती झाली आहे.

राज आणि कावेरी यांचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे.

अनेक संकटं पार करून अखेर राज आणि कावेरी एकत्र येणार आहेत.

या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या लग्नासाठी कावेरीने खास मराठमोळा लूक केला आहे.

नऊवारी, नथ, शेला, हिरवा चुडा या लुकमध्ये कावेरी खूप सुंदर दिसत आहे.

तर, राजवर्धनचा मराठमोळा बाज सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे. सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख सगळ्या विधी पर पडणार आहेत.

मोठ्या धुमधडाक्यात या दोघांचे लग्न 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे.