डान्सिंग दिवा नोरा कधी वेटरचं तर लॉटरी विकायची, असं पलटलं नशिब

Shweta Shigvan-Kavankar

‘डान्सिंग दिवा’ नोरा फतेहीचा आज वाढदिवस. चित्रपट सृष्टीत येण्यापुर्वी नोराने मोठा स्ट्रगल केला आहे.

कॅनडावरुन जेव्हा नोरा भारतात आली होती तो तेव्हा तिच्याकडे फक्त पाच हजार रुपये होते.

बॉलिवूडमध्ये येण्याआधी नोरानं वेटरचं, तर कधी लॉटरी विकायचंही काम केलं आहे.

मुंबईत ती भाड्याच्या घरामध्ये जवळपास आठ मुलींसोबत शेअरींग करत राहत होती.

नोराने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, सुरुवातीच्या काळात जेव्हा मी स्ट्रगल करत होते तेव्हा, एका कास्टिंग एजंटशी माझी ओळख झाली होती. पण, त्या व्यक्तीने माझा अपमान केला होता, माझ्या चेहऱ्याबद्दल, शरीराबाबतही तो खूप घाणेरडे शब्द वापरुन बोलला.

हिंदी येत नसल्याने लोक माझी खिल्ली उडवायचे. ऑडिशनला जातानाही मला खूप अडचणी यायच्या, असे तिने सांगितले.

२०१४ मध्ये तिनं ‘रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटले. त्यानंतर चित्रपटांमधील आयटम साँग्समुळे ती प्रकाशझोतात आली.

'बिग बॉस' च्या सिझन 9 या शोमधून नोरा झळकली होती. त्यानंतर तिला अधिक लोकप्रियता मिळाली.

काही दिवसांपूर्वीच नोराचा गुरु रंधावासोबत एक अल्बम ‘ नाच मेरी रानी’ लाँच झाला होता. हा अल्बम यूट्यूबवर सुपरहिट ठरला होता. या अल्बमला जवळपास २० कोटी व्ह्यूज होते.