दीपिका पदुकोण 'या' चित्रपटांमुळे सापडली होती वादात

Shweta Shigvan-Kavankar

दीपिका पादुकोन आज 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक दीपिका तिच्या अनेक चित्रपटांमुळे वादात सापडली आहे.

ओम शांती ओम हा चित्रपट वादात सापडला होता. हा वाद दीपिकाचा नसून चित्रपटातील एका दृश्यावरून झाला होता. या सीनमध्ये मनोज कुमारचा अभिनय दाखवण्यात आला होता. यावर मनोज कुमार यांनी आक्षेप घेतला आणि हे दृश्य चित्रपटातून काढून टाकण्यात आले.

राम लीला चित्रपटाच्या नावावरून वाद निर्माण झाला होता. चित्रपटाचे नाव जरी राम लीला असले तरी लोकांनी याला धार्मिक अर्थाशी संबंधित म्हटले आणि त्यात दाखवलेल्या दृश्यावर आक्षेप घेतला.

बाजीराव मस्तानी चित्रपटातील पिंगा हे गाणे दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात पेशव्यांच्या पत्नीने नृत्य केल्याने वाद झाला होता.

गहराइयां या चित्रपटातील दीपिकाच्या इंटिमेट सीन आणि बिकिनी सीनबाबत वाद निर्माण झाले होते.

पद्मावत या चित्रपटाबाबत अनेक वाद निर्माण झाले होते. चित्रपटाचे नाव बदलण्यापासून ते दीपिकाच्या कपड्यांपर्यंत वाद निर्माण झाला होता.

छपाक दोन वादांमुळे हा चित्रपट चर्चेत आला होता. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची कथा दाखवणाऱ्या या चित्रपटात दुसऱ्या धर्माचा आरोपी दाखवल्याने वाद झाला होता. याशिवाय चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिका जेएनयूमध्ये सीएए विरोधी आंदोलनात सहभागी झाली होती.

पठान चित्रपटातील एका गाण्यावरून झालेल्या वादामुळे चित्रपटाला आणखी प्रमोशन देण्यात आले आहे.