RRR नंतर ऑस्करमध्ये दीपिका पदुकोणची एंट्री, चाहत्याकडून कौतुकाचा वर्षाव

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे.

तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

अशातच, दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

95 व्या ऑस्कर सोहळ्यात दीपिका प्रेझेंटर म्हणून दिसणार आहे.

दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.

तिने पोस्टमध्ये म्हंटले की, ती अमेरिकन अभिनेत्री एरियाना डेबोससोबत ऑस्कर सोहळा होस्ट करणार आहे.

दीपिका पदुकोण व्यतिरिक्त इतर हॉलिवूड सेलिब्रिटी देखील होस्ट म्हणून दिसणार आहेत.

या पोस्टवरुन चाहते दीपिकाचे कौतुक करत आहेत. शांती प्रिया ते ऑस्कर प्रेझेंटरपर्यंत तू खूप पुढे आली आहेस. तर दुसऱ्या युजरने लिहिले, याला म्हणतात जगावर राज्य करणे.

९५ वा ऑस्कर रविवारी १२ मार्च २०२३ रोजी प्रसारित होणार आहे.

दक्षिण सिनेमाचा चित्रपट आरआरआर यावर्षी ऑस्करच्या शर्यतीत भारताकडून प्रबळ दावेदार आहे.