लिव्ह-इनमध्ये राहूनही 'हे' स्टार्स टीकवू शकले नाही त्यांचे नाते

shweta walge

रणबीर कपूर-कतरिना कैफ

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ही जोडी एकेकाळी बॉलिवूडची सर्वात आवडती जोडी मानली जात होती. दोघांचे नाते सहा वर्षे टिकले होते, तसेच दोघे लिव्ह-इनमध्ये राहत होते.

सुशांत सिंग राजपूत-अंकिता लोखंडे

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.

प्रियांका चोप्रा-शाहिद कपूर

प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूर एकाच इमारतीत राहत होते. पण त्यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपचे गुपित तेव्हा उघड झाले जेव्हा आयटीच्या छाप्यात हा अभिनेता अभिनेत्रीच्या घरी सापडला. मात्र, काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

टायगर श्रॉफ-दिशा पटनी

लिव्ह-इनमध्ये टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी यांचीही नावे आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार दिशाला लग्न करायचे होते, तर टायगर श्रॉफला लग्नाची घाई नको होती. हीच गोष्ट त्यांच्या ब्रेकअपचे कारण ठरली.

जॉन अब्राहम-बिपाशा बसू

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांचीही नावे आहेत. हे दोघेही मीडियासमोर उघड करायला घाबरले नाहीत. पण 9 वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

सुशांत सिंग राजपूत-रिया चक्रवर्ती

अंकिता लोखंडेशिवाय सुशांत सिंग राजपूत जवळपास एक वर्ष अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. मात्र अभिनेत्याच्या मृत्यूच्या सहा दिवस आधीपासून ती तिच्या घरी राहू लागली होती.

दीपिका पदुकोण-निहार पंड्या

रणबीर कपूरला डेट करण्यापूर्वी दीपिका पदुकोण अभिनेता निहार पांड्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही वर्षानुवर्षे लिव्ह इनमध्ये होते. पण 'ओम शांती ओम' नंतर दोघांनीही आपले मार्ग वेगळे केले होते.