देवों के देव महादेव फेम मोहित रैनाच्या घरी नन्ही परीचे आगमन

Shweta Shigvan-Kavankar

टीव्ही मालिका देवों के देव महादेव फेम अभिनेता मोहित रैनाने चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

मोहितच्या घरी नन्ही परी आली आहे. मोहित आणि त्याची पत्नी आदिती शर्मा आई-वडील झाले आहेत.

अभिनेत्याने सोशल मीडियावर ही गोड बातमी दिली आहे. यासोबतच त्याने एक फोटोही शेअर केला आहे.

यामध्ये त्याच्या मुलीने मोहितचे आणि आदितीचे बोट धरले आहे.

मोहितने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, आणि मग आम्ही तिघे झालो. बाळाचे स्वागत आहे.

चाहत्यांनी मोहित आणि आदितीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

मोहित आणि आदिती यांचे २०२० मध्ये लग्न झाले होते.

लग्नाआधी मोहित आणि अदिती एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं.

आता दोघांनीही आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे.