Shweta Shigvan-Kavankar
देवों के देव महादेव या मालिकेतील पार्वती म्हणजेच अभिनेत्री सोनारिका भदोरिया नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना अपडेट्स शेअर करत असते.
नुकताच तिचा साखरपुडा पार पडला आहे.
या सोहळ्याचे काही फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनारिका भदोरिया तिच्या पार्टनर विकास पराशरसोबत पोज देताना दिसत आहे.
सोनारिका भदोरियाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
यामध्ये सोनारिका सिक्विन गाऊनमध्ये दिसत आहे.
तिने इंस्टाग्रामच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 3 डिसेंबर रोजी माझे संपूर्ण आयुष्याभरासाठी भेट मिळाली! यासाठी मी सदैव कृतज्ञ आहे. हॅपी रोका लव्ह.
चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.
सोनारिका भदोरिया नुकतीच इश्क में मरजावां या मालिकेत दिसली होती.