चेहऱ्यावर जखमा, डोळ्यात अश्रू, शूटिंगमध्ये असे काही घडले की अभिनेत्रीचा झाला चेहरा खराब

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री-दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमार हे बॉलिवूडमधलं खूप प्रसिद्ध नाव आहे.

तिने अनेक अल्बममध्ये काम केले असून चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. सध्या दिव्या तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

दिव्याला शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे.

तिने इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर करुन ही माहिती दिली आहे.

यामध्ये तिच्या चेहऱ्यावर दुखापतीच्या खुणा दिसत आहेत. तिच्या चेहऱ्यावर झालेल्या दुखापतीमुळे लाल ठिपके आहेत.

दिव्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, अॅक्शन सीनचे शूटिंग करताना मला खूप दुखापत झाली. पण शो मस्ट गो ऑन. तुमचे सर्व आशीर्वाद आणि उपचार ऊर्जा हवी आहे.

दिव्याचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

नुकतेच दिव्या खोसला कुमारने तिच्या मोस्ट अवेटेड सिक्वेल 'यारियाँ 2' च्या शूटिंगबद्दल माहिती दिली होती.

यारियां 2 यावर्षी 20 ऑक्टोबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे दिव्या खोसला सात वर्षांनी दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहे.

तिचा शेवटचा दिग्दर्शित चित्रपट 'सनम रे' (2016) होता. या चित्रपटात पुलकित सम्राट, यामी गौतम आणि उर्वशी रौतेला यांनी काम केले आहे.