कोरडा खोकला कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Siddhi Naringrekar

हळद आणि दूध १ ग्लास दूधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून प्यायल्याने देखील तुम्हाला चांगला फायदा होईल.

चणे खा कोरडा खोकला कमी करण्यासाठी सतत चणे खात राहा. याने देखील तुम्हाला चांगला फायदा होईल.

आल्याचा छोटा तुकडा बारीक कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्या किंवा जो रस निघेल तो गिळत राहा.

एका मोठ्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मीठ मिक्स करा. या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून दोन वेळा हा उपाय करावा. खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे.

कांद्याचा रस कोरडा खोकला खूप जास्त प्रमाणात येत असेल तर १ चमचा कांद्याचा रस प्या. याने देखील तुम्हाला चांगला फायदा होईल.

गुळ पोटात जावा व आपण कायम निरोगी राहावं. सर्दी आणि खोकल्यावर गूळ खाणे हा प्रभावी उपाय आहे.

ज्येष्ठमधाचा चहा प्यायल्यानंतर कोरडा खोकला कमी होतो. हा चहा तयार करण्यासाठी कपभर पाण्यामध्ये दोन मोठे चमचे ज्येष्ठमधाची पावडर उकळत ठेवा. १० ते १५ मिनिटे पाणी उकळू द्या. यानंतर कपामध्ये चहा गाळून घ्या

कोरड्या खोकल्यावर मधाचे सेवन करणं हा रामबाण उपाय मानला जातो. मधामुळे घशातील खवखव कमी होते.