ईशा गुप्ताचा हाय-स्लिट गाऊनमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर हॉटनेसचा जलवा

Shweta Shigvan-Kavankar

जन्नत 2 फेम अभिनेत्री ईशा गुप्ताने यावर्षी कान्स 2023 मध्ये पदार्पण केले आहे.

ईशा गुप्ता रेड कार्पेटवर ग्लॅमरस अंदाजात हॉटनेसचा तडका लावला आहे.

तिचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यामध्ये ईशाने हलक्या गुलाबी हाय-स्लिट गाऊनमध्ये दिसत आहे.

हा गाऊन ओटीटी कॉलर आणि नेक लेस स्टाइलने फुलांनी सजवण्यात आला होता.

ईशा गुप्ताने लाईट मेकअपसह आपला लूक पूर्ण केला होता.

मॅचिंग कानातले अभिनेत्रीचा लूक अधिक आकर्षक करत होते.

कान्सच्या रेड कार्पेटवर ईशा अतिशय सुंदर दिसत होती. परंतु, काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

एका युजरने लिहीले की, नाईट ड्रेससारखा गाऊन दिसत आहे. तर आणखी एकाने म्हंटले की, हे काय घालून गेली आहेस?