रिअल लाईफमध्येही भाग्यश्री मोटे आहे 'एकदम कडक'

Shweta Shigvan-Kavankar

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते.

भाग्यश्री वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

तिचे फोटो हे नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. तसेच, तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो.

काही दिवसांपूर्वीच भाग्यश्रीनं तिच्या आयुष्यातील 'स्पेशल' व्यक्तीबाबतची माहिती चाहत्यांना दिली होती.

भाग्यश्रीचा मेक-अप डिझायनर असलेल्या विजय पालांडेसोबत साखरपुडा झाला आहे.

चिकाटी गडिलो चिथा कोटूडू या तेलगू सिनेमातून भाग्यश्रीनं दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.

देवयानी ही तिची पहिली मराठी मालिका होती. तर, तिचा मराठी सिनेमा क्षेत्रातला पदार्पणाचा सिनेमा 'शोधू कुठे' हा होता.

भाग्यश्रीने काय रे रास्कला, पाटील, माझ्या बायकोचा प्रियकर, विठ्ठल, मुंबई मिरर या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

भाग्यश्रीचा आता एकदम कडक हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.