Siddhi Naringrekar
कोकणात सत्यनारायण पूजेला फार महत्व आहे.
ही पूजा विशेष प्रसंगी आणि यशाच्या वेळी, परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देखील केले जाते.
संध्याकाळी ही पूजा करणे अधिक योग्य मानले जाते. तथापि, एखादी व्यक्ती सकाळी ही पूजा देखील करू शकते.
हिंदू धर्मियांमध्ये सत्यनारायणाच्या पूजेला महत्त्व दिलं गेलं आहे.
भगवान विष्णूंना नारायण रुपात पुजणे यालाच 'सत्यनारायण' म्हणतात.
सत्यनारायणाच्या कथेचे दोन प्रमुख विषय आहेत.
यातील एक विषय आहे संकल्प करणे आणि दुसरा आहे प्रसाद.
विद्वानांच्या मते स्कंद पुराणातील रेवा खंडात याचा उल्लेख आहे.
यातील श्लोक पाचही खंडांत विभागले गेले आहेत. यात एकूण १७० श्लोकांचा समावेश होतो.
कोकणात सत्यनारायणाच्या पूजेसाठी मखर तयार करण्यात येतो. हल्ली खूप वेगवेगळ्या आकर्षक मखरात सत्यनारायणाची पूजा केली जाते.