'गौतमी मॅडम लग्न कधी करणार?' चाहत्याचा प्रश्न अन्...

Shweta Shigvan-Kavankar

लावणीच्या माध्यमातून प्रसिध्दीस आलेल्या गौतमी पाटीलने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे.

राज्यभरात गौतमीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडिओ चाहत्यांचे नेहमीच लक्ष वेधून घेत असतात.

तिच्या एका पोस्टसाठी चाहते वाट पाहत असतात.

अशातच, गौतमीने एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला आहे.

यावर एका चाहत्याने थेट तिला तिच्या लग्नाविषयी विचारले आहे.

त्यानं गौतमीला तुम्ही लग्न केव्हा करणार आहे? असे विचारले आहे.

यावर आता नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.

गौतमीला अनेकदा लावणीवरुन ट्रोल करण्यात आले आहे. परंतु, माझी लावणी नसून डीजे कार्यक्रम असल्याचा दावा तिने केला आहे.

गौतमी पाटील लवकरच आता वेब सीरीजमध्ये झळकणार असल्याचे समोर आले आहे.